मराठी उखाणे - भाग 6 | marathi ukhane - part 6
02:51- मातीच्या चुली घालतात घरोघर
.............. झालीस माझी आता चल बरोबर
- साधी राहणी, उच्च विचारसरणी
याच तत्त्वाने वागेल ...ची गृहिणी
- मोह नाही माया नाही, नाही मत्सर हेवा
........... चे नाव घेते नीट लक्ष ठेवा
- चांदीच्या ताटात अगरबत्तिचा पुडा
......... च्या नावाने भरला हिरवा चुडा
- संथ संथ वाहे वारा मंद मंद चाले गती
देवा सुखी ठेव ............ची जोडी
- कुंकु लावत ठसठशीत, ह्ळ्द लावते किंचित,
..... आहेत माझे पूर्व संचित
- फुलासंगे मातीस सुवास लागे,
.... नि माझे जन्मोजन्मिचे धागे
- हिरवा शालू लेवुनि येतो श्रावण महिना,
.... हाच माझा खरा दगिना.
- भारतीय नारी पतिला देते उच्च स्थान,
...... चे ठेवीन सदोदित मान.
- पारले जी ची बीस्कीटे, बेडेकरंचा मसाला
.........नाव घ्यायला आग्रह कशाला
- माझ्या धान्याचे माप आज शिगोशीग भरले,
म्हणून ........ रावांची मी सौभाग्यवती झाले
0 comments