नवरी आहे गोरी तिला हळद लावली थोडी

06:02




नवरी आहे गोरी तिला हळद लावली थोडी 
लेकीच्या करता जावयाची गोडी
माझी लेक आहे खडीसाखरेची पुडी

जावयाचा मान एवढा केला कशासाठी
लेकी राजबाई तुझ्या जीवासाठी 
मोहराची वाटी ठेवली बोहोल्याच्या कोना
गोरेबाई माझी तुझ्या वराला दक्षिणा 
लक्ष्मी आली घरा आता तू जाऊ नको
माझ्या बाळराजाला अंतर देऊ नको 
लक्ष्मीबाई आली मागच्या दारान 
कडा उघडावी धाकटया दिरान 
लक्ष्मीबाई आली सई सांजच्या भरात
कुंकवाची पुडी साक्ष ठेविली दारात

पहिला दिवस पुसाव चांगला 
हिरव्या चोळीवर काढला बंगला

दुसर्या दिवशी मित्र पुशी सोबत्याला 
का रे गडया पिवळा घरी राणीचा सोहळा 

तिसर्या दिवशी माय पुसे ब्राह्मणाला 
मुहूर्त चांगला हिरवी चोळी कामिनीला

चवथ्या दिवशी घर गुलालांनी लाल
पेटचा हा लाल त्याचे शांतीक झाल काल 

पाचव्या दिवशी लिंबा डाळिंबाची पाटी 
गोर्या राधिकेच्या जवळी बाळ निजे नवसाचा

सातव्या दिवशी ब्राह्मणाला दिली गाय
ऐकते शांतीपाठ हरखून माय

आठव्या दिवशी पत्र फुलार्याला धाडा
गोर्या राधिकेला गुंफावा जाई तोडा

नवव्या दिवशी शेजेला फुल दाट
गोर्या राधिकेन केला हा थाटमाट 

दहाव्या दिवशी वाजती चौघडे 
बाई हशीत खुशीत निरोप माहेराला धाडे

बहिणीच्या घरी भाऊ गेला लई दिसा
हाती बेल तांब्या बहीण पुजिती तुळसा
बहिणीच्या घरी भाऊ गेला लई दिसा
सोनियाचा गोफ कमरी 
करदोडयाचा फासा
बहिणीला भाऊ मोठा दुर्लभ वाटीयला 
समया कारण भाऊ आला भेटायला 
बहीण भावंड आहेत समस्तला
बहिणीची माया लई माझ्या ग बंधूला
बहिणीच्या घरी भाऊ करतो देऊ देऊ
बहिणीच्या आशीर्वादान माडी कळसाला जाऊ
नको भावा म्हणू बहिणींनी नासल 
बहिणीच्या आशिर्वादे धनधान्य ते सायल
बहिणीच्या आशिर्वादे भाऊ झालेत कुबेर
चिरेबंदी वाडे बांधले चहुखोर

You Might Also Like

0 comments

Search This Blog

Contact Form

Name

Email *

Message *

Blog Archive