मराठी उखाणे - भाग 3 | marathi ukhane - part 3

02:27



  • दौलत होति तुळस माहेरच्या अंगणात    

..........साथि फुलेल आता सासरच्या व्रुन्दवनात्


  • प्रेमरूपी दिव्यात लावते प्रीतिची वात,

……रावांचे नाव घ्यायला केली आजपासून सुरुवात.


  • गीत गोविंदात श्रीकृष्णाने खेळीला राधेशी रास,

.... चे नाव घेते सुनमुख प्रसंगी सासुबाई पुढे घातली धान्याची रास



  •  नदीच्या काठावर कृष्ण वाजवितो बासरी,

……………………रावां सोबत आली मी सासरी.


  • आकाशाच्या प्रागंणात ब्रन्हाविश्नु आणि महेश ,

......च नाव घेवुन करते मि ग्रुह प्रवेश


  •  गुलाबाच्या झाडाला फूल येतात दाट,

……..रावांचे नाव घेते सोड़ा माझी वाट.


  • शुभमंगल प्रसंगी अक्षदा पडतात माथी,

आता …….राव माझे जीवनसाथी.


  •  मंगलअष्टका झाल्या,अंतरपाट झाला दूर 

…….. रावांची सौभाग्यवती झाले सांगतात सनईचे सूर.


  • गोऱ्या गोऱ्या हातावर रेखाटली मेहंदी,

…….रावांचे नाव घेण्याची वारंवार येवो संधी.


  • प्रेमरूपी कादंबरी प्रेमाने वाचते

 ……. रावांच्या जीवनातील फुले आनंदाने वेचते.


  • दोन जीवांचे मिलन जणू शत-जन्माच्या गाठी,

………चे नाव घेते तुमच्या साठी



  •  आकाशाच्या प्रागंणात ब्रन्हा विष्णु आणि महेश,


……………रावांच नाव घेते आणि करते मी गृहप्रवेश.


  •  सत्यवानाच्या सुटकेसाठी सावित्रीने केला यमाचा पिच्छा

 …… रावांची सेवा घडो हीच माझी इच्छा.

You Might Also Like

0 comments

Search This Blog

Contact Form

Name

Email *

Message *

Blog Archive