मराठी उखाणे - भाग 2 | marathi ukhane - part 2

02:18


  • वृक्षाच्या छायेत, वनदेवी घेते विसावा
 ........चे नाव घेते सर्वांचा आशीर्वाद असावा .

  • अमूल्य आहेत तुम्हा सर्वांचे आशीर्वाद न सदिच्छा ,
असेच सदैव मी व ...........च्या पाठीशी राहा हि मनीषा 


  • मंगळसुत्रातील दोन वाटया सासर आणि माहेर
 .......रावांनी दिला सौभाग्याचा आहेर.


  • अरबी समुद्रात उसळल्या लाटा
......च्या सुख-दुःखात माझाही वाटा


  • एका वर्षात महिने असतात बारा,
......... या नावात सामावलाय आनंद सारा


  • सुशिक्षित घराण्यात जन्मले, कुलवंत घराण्यात आले
.....रावाचे नाव घेउन मी सौभाग्यवति झाले


  • नाव घ्या नाव घ्या आग्रह असतो सर्वांचा ,
..........रावांचे नाव असते ओठावर पण प्रश्न असतो उखाण्यांचा 


  • आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा,
...........चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा!"


  • द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान
......चे नाव घेते ऐका देऊन कान


  • ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल
........ चे नाव घेते तुमच्यासाठी


  • लाल मणी तोडले; काले मणी जोडले,
 .......रावांसाठी मी माहेर सोडले.


  • अत्तराचा सुगंध दरवऴ्ला चहुकडे
......रावांच्या नावाचा लौकिक होउ दे सगळिकडे 


  • कळी हसली ,फुल उमलले,मोहरून आला सुगंध,
..........च्या सोबतीत मला गवसला जीवनाचा आनंद 

You Might Also Like

0 comments

Search This Blog

Contact Form

Name

Email *

Message *

Blog Archive