गमतीदार उखाणे - भाग 1
02:14- ........रावांच्या लग्न मांडवात पंचपक्वांनाच्या राशी,
पोट्टे पाट्टे जेवुन गेले, जावई राहीला उपाशी.
- सावित्रीबाई फुलेंनी दिले स्त्री शिक्षणाचे धडे,
..... ना आवडतात गरम गरम साबुदाणे वडे.
- एक होती चिऊ एक होती काऊ,
…… रावांच नाव घेते , डोक नका खाऊ.
- चान्दिच्या ताटात फणसाचे गरे
.................राव दिसतात बरे पण वाकतिल तेव्हा खरे
- वाकडी तिकडी बाभूळ, तिच्यावर बसला होला,
सखा पाटील मेला , म्हणून तुका पाटील केला.
- गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची,
........... माझी बायको आहे मोठी लुच्ची
- पुणे मध्ये आमचा बंगला उभा आहे ऐटीत
जळू नका लोकहो.........राव आहेत आय. टी. त
- श्रावणात पडतोय रोज पारिजातकांचा सडा,
.......... ना आवडतो गरम गरम बटाटेवडा.
- सुंदर सुंदर हरणाचे फेगडे फेगडे पाय
............. अजून नाही आले पिऊन पडले की काय
- पुणे तेथे काही नाही उणे
.............. गावाला गेल्यावर घर होते सूनेसूने
- तेलाच्या दिव्याला तुपाची वात,
……..रावांशी केले लग्न, आता आयूष्याची वाट.
- धनत्रयोदशीला करतात धनाची पुजा,
.......... च्या जीवावर करते मी मजा
- ............. करतात शुध्दलेखनात भेसळ
मी त्याची तर्री ते माझी मिसळ
- दुधाचे केले दहि, दह्याचे केले ताक,
ताकाचा केला मठ्ठा, ...... चे नाव घेतो ..... रावान् चा पठ्ठा
0 comments