मराठी उखाणे - भाग 1 | Marathi Ukhane Part 1

01:49



  • द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान

............ चे नाव घेते ऐका देऊन कान


  • चांदीच्या करंड्याला नक्षीदार झाकण

.............रावांचं नाव घेऊन सोडते कंकण


  • कळी हसली ,फुल उमलले,मोहरून आला सुगंध,

..........च्या सोबतीत मला गवसला जीवनाचा आनंद        


  • पानापानावर पसरले कोवळे कोवळे ऊन

.............रावांचं नाव घेते ..........ची सून


  • उभा होतो मळयात, नजर गेली खळयात

नवरत्नांचा हार ............च्या गळयात

  • दोन जीवांचे मिलन जणू शत-जन्माच्या गाठी,
.........चे नाव घेते तुमच्या आग्रहासाठी

  • वर्तन असावे नम्र, शब्द असावा गोड

............रावांच्या संसाराला माझी आनंदी जोड 


  • बहरली फुलांनी निशिगंधाची पाती

............ चे नाव घेतो लग्नाच्या राती


  • शुभ काळी शुभ वेळी आली आमची वरात

...........रावांचे नाव घेते सासरच्या घरात


  • अमूल्य आहेत तुम्हा सर्वांचे आशीर्वाद न सदिच्छा ,

असेच सदैव मी व ...........च्या पाठीशी राहा हि मनीषा 


  • गीतात जसा भाव, फुलांत जसा सुगंध

............च्या जीवनात मला भरभरून आनंद


  • नांदा सौख्यभरे दिला सर्वांनी आशीर्वाद ,

...........चे नाव घेते द्या सत्यनारायणाचा प्रसाद


  • आशेच्या रंगमंचावर स्वप्नांचे पडसाद ,

.........चे नाव घेते तुम्हा सर्वांचा आशीर्वाद

You Might Also Like

0 comments

Search This Blog

Contact Form

Name

Email *

Message *

Blog Archive