मराठी उखाणे - भाग 4 | marathi ukhane - part 4

02:35



  • कण्वमुनींच्या आश्रमात शकुंतलेचे माहेर
......... रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर.




  • पेरु खाते चिरुन संत्री खाते सोलुन केळीची काढते साल
.........रावाच्या नावाचे कुंकु लावते लाल .




  •  मला नको हिरे,माणके, नको आकाशातील तारे 
……… हेच माझे अलंकार खरे.



  •  भावंडांचा सहवास, आई वडिलांचा आशीर्वाद 
………. रावांचे नाव घेताना तुमचेही लाभो आशीर्वाद



  • पार्वती ने पन केला महादेवालाच वरीन,
...........रावांच्या साथीन, आदर्श संसार करीन



  • नांदा सौख्यभरे दिला सर्वांनी आशीर्वाद ,
………..रावांचे नाव घेते दया सत्यनारायणाचा प्रसाद



  • शिवाजी राजांनी किल्ला जिंकला शक्ति पेक्षा युक्ति ने,
.......रावांच नाव घेते प्रेमा पेक्षा भक्ति ने



  •  नदीच्या काठी कृष्ण वाजीवतो बासरी 
……. रावांच्या जीवावर मी आहे सुखी सासरी .




  • उगवला चंद्र मावळला शशी 
…….. चे नाव घेते हळदी-कुंकवाच्या दिवशी



  • चमकती बिजली निलवाणी आकाशात 
…….. रावांचे नाव घेते सौभाग्याच्या प्रकाशात.





You Might Also Like

0 comments

Search This Blog

Contact Form

Name

Email *

Message *

Blog Archive