रुखवंत उचलतांनाचे उखाणे - भाग -२
04:37- आला आला रुखवत, त्यात होता रवा,
विहीणबाई च्या घरी सोन्याचा तवा.
- आला आला रुखवत, त्यात होता पेरू,
सोन्या सारखी मुलगी दिली विहीणबाई कसे उपकार फेडू
- आला आला रुखवत, त्यात होती अंगठी
विहीणबाई चला फिरू जरा तलवा काठी
- आला आला रुखवत त्यात होता पेढा
विहीणबाई चला आता जेवायला वाढा.
- आला आला रुखवत, त्यात होती मटकी ,
विहीणबाईना लागते माझ्या बसल्या बसल्या डुलकी
0 comments