ओवाळीतो स्वामीराया । माथा पदी ठेवूनीया

04:20


ओवाळीतो स्वामीराया । माथा पदी ठेवूनीया ।।धृ।। 
आवरी जगन्मोहिनीला । दावी चिन्मय स्वरूपाला ।।
 देई सद्बुध्दी मजला । प्रेमे तव यश गाण्याला ।।।।चाल।। 
भक्तांकितां स्वामीराया, चरणी मी शरण ।। 
करूनी भय हरण, दावी सुख सदन ।। 
अमित मम दोष त्यागुनीयां । विनवितो दास तुला सदया ।। १ ।। 
जन-पदमुक्ति-पदान्याया । स्थली या अवतरला राया ।।चाल।। 
ही जड मुढ मनुज-काया । पदीं तव अर्पियली राया ।।चाल।। 
हे दिग्वसन योगीराया, नको मज जनन पुनरपि मरण, येत तुज शरण ।। 
पुरवी ही आस संतराया । प्रार्थना हीच असे पाया ।। २ ।।
 नेण्या अज्ञ-तमा विलया । अलासी ज्ञान रवी उदया ।। 

करी तु ज्ञानी जनाराया । निरसुनी मोह - पटल माया ।। चाल ।। 

गजानन संतराया असशी बळवंत । तसा धीमंत नको बघु अंत ।
विनवितो दास तुम्हा राया । नका त्या दूर करू सदया ।।३।।

You Might Also Like

0 comments

Search This Blog

Contact Form

Name

Email *

Message *

Blog Archive