त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा । त्रिगुणी अवतार त्रैलोक्य-राणा ॥ नेती नेती शब्दें नये अनुमाना । सुरवर मुनीजन योगी समाधि न ये ध्याना ॥१॥ जय देव जय देव जय श्रीगुरूदत्ता । आरति ओवांळीता हरली भवचिंता ॥ध्रु॥ सबाह्य-अभ्यंतरीं तू एक दत्त । अभ्याग्यासी कैचीं कळेल ही मात ॥ पराहि परतलिं तेथे कैंचा हा हेत । जन्ममरणाचा पुरलासे अंत ॥ जय ॥२॥ दत्त येऊनियां उभा ठाकला । सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला ॥ प्रसन्न होऊनी आशिर्वाद दिधला । जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥ जय ॥३॥ दत्त दत्त ऐसे लागले ध्यान । हारपलें मन झालें उन्मन ॥ मीतूंपणाची झाली बोळवण । एकाजनार्दनीं श्रीदत्तध्यान ॥ जय ॥४॥
0 comments