मराठी उखाणे - भाग 10 | marathi ukhane - part 10

03:21





  • रूसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास

.... ला भरवतो मी जिलबीचा घास.


  • मावळला सूर्य उगवला शशी

...... चं नाव घेते ...... च्या दिवशी


  • सुख समाधान तेथे लक्ष्मीचा वास

.......... ना भरवते मी ..... चा घास.


  • माहेरचे निरांजन सासरची वात

......... चे नाव घेऊन करते संसाराला सुरूवात.


  • गणपति च्या  देवळात धुपाचा वास

.....ला भरवतो मी लाडूचा घास.


  • श्रीकृष्णाने केले अर्जुनाच्या रथाचे सारथ्य

....... आणि माझ्या संसारात होईल तुमचे आदरातिथ्य


  • शंकराची पूजा करते पार्वती खाली वाकून

........चं नाव घेते सर्वांचा मान राखून.


  • अनेकांनी लिहीली काव्ये, गायली सौंदर्याची महती

काल होते युवती आज झाले .... ची सौभाग्यवती


  • शारदेने छेडली सतार, मधुर उमटले झंकार

....चं सौभाग्य हाच माझा अलंकार.


  • हिवाळ्यात वाजते थंडी, उन्हाळ्यात लागते उन,

….. रावांचे नाव घेते….ची सुन!


  • भाद्रपद महिन्यात गणपती बसवतात शाडूचा

......... ला  देते घास लाडूचा.


  • पेटी वाजे वीणा वाजे सतार वाजे छान

........चं नाव घेते सर्वांचा राखून मान.

You Might Also Like

0 comments

Search This Blog

Contact Form

Name

Email *

Message *

Blog Archive