मंगलागौरी चे उखाणे - भाग २

01:56



  • दंडात घालते वाकी , हातात घालते तोडे
.........रावांचे नाव घेते मंगलागौरी पुढे.


  • शुभ प्रसंगी लावतात दरवाजाला मंगल तोरण 
..............रावांचे नाव घेते मंगलागौरी आहे कारण

  • मावळला सूर्य उगवला शशी
.............रावांचे नाव घेते मंगलागौरी च्या दिवशी


  • कुबेरा घरी सोन्या-चांदीच्या राशि
...............रावांचे नाव घेते मंगलागौरीपाशी


  • चांदी च्या ताटात खडी साखरे चे खडे

..............रावांचे नाव घेते मंगलागौरी पुढे


  • ताजमहल बांधण्यासाठी कारिगर होते कुशल

.............रावांचे नाव घेते मंगलागौरीसाठी स्पेशल




  • शब्द आणि अर्थ , कवी आणि कविता 
...............रावांचे नाव घेते मंगलागौरी करिता






  • वृक्षाच्या छायेत, वनदेवी घेते विसावा

    •  ........चे नाव घेते मंगलागौरी तुझा आशिर्वाद असावा


    You Might Also Like

    0 comments

    Search This Blog

    Contact Form

    Name

    Email *

    Message *

    Blog Archive