गाडी गुलाबी, बैलं खिलारी
09:06
गाडी गुलाबी, बैलं खिलारी,
भाऊ सजना, दादा सजना,
बहिणीच्या नथासाठी, मोडं खजिना.
गाडी गुलाबी, बैलं खिलारी,
भाऊ सजना, दादा सजना,
बहिणीच्या डुलासाठी, मोडं खजिना.
गाडी गुलाबी, बैलं खिलारी,
भाऊ सजना, दादा सजना,
बहिणीच्या पैंजनासाठी, मोडं खजिना.
गाडी गुलाबी, बैलं खिलारी,
भाऊ सजना, दादा सजना,
बहिणीच्या बांगडीसाठी, मोडं खजिना
गाडी गुलाबी, बैलं खिलारी,
भाऊ सजना, दादा सजना,
बहिणीच्या लेणसाठी, मोडं खजिना.
गाडी गुलाबी, बैलं खिलारी,
भाऊ सजना, दादा सजना,
बहिणीच्या चोळीसाठी, मोडं खजिना.
0 comments