श्रीवटसावित्री पौर्णिमा चे महत्व व कथा आणि पुजेची माहिती
15:31श्रीवटसावित्री पौर्णिमा चे महत्व व कथा आणि पुजेची माहिती :
तमाम भारतखंडातील स्त्रिया वडाची पूजा करतात.
यामागे भाव असतो तो जन्मोजन्मी मला हाच पती मिळावा.
वडाच्या झाडाला दोरयाचे वेष्टन देवून,दिवसभर उपवास व्रत आचरून सती-सावित्रीचे हे व्रत मोठ्या भक्तिभावाने होत असते..!
वटपौर्णिमा पूजन व माहीती
कथा:-
जेष्ठ पौर्णिमा हा दिवस "वटपौर्णिमा" म्हणून साजरा केला जातो. हे व्रत सुवासिनी अपल्या पतिला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात.
अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली.
सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राज्याचा धृमत्सेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच माहित असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला.
पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला. व जंगलात येऊन नवऱ्याबरोबर सासू सासऱ्याची सेवा करू लागली.
सत्यवानाचा मृत्यू जेंव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेंव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्या बरोबर गेली. लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला. यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागली. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले. पण तिने साफ नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला. अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासूसासऱ्याचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला. यमराजाने गफलतीने तथास्तु म्हटले. तेंव्हा त्या वचनबध्द झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व सावित्री व्रत आचरतात.
वटपौर्णिमेचे व्रत सुरू होण्यामागील पूर्वपीठिका : यमधर्माने सत्यवानाचे प्राण हरण केल्यावर सावित्रीने यमधर्माशी तीन दिवस शास्त्रचर्चा केली. त्यावर प्रसन्न होऊन यमधर्माने सत्यवानाला पुन्हा जिवंत केले. ही चर्चा वटवृक्षाच्या झाडाखाली झाली; म्हणून वटवृक्षाशी सावित्रीचे नाव जोडले गेले. सावित्रीप्रमाणेच आपल्या पतीचे आयुष्य वाढावे म्हणून स्त्रियांनी या व्रताची सुरुवात केली.
व्रताची देवता :
- सावित्रीसह ब्रह्मा ही या व्रताची मुख्य देवता आहे.
वटपौर्णिमेला स्त्रियांनी वटवृक्षाची पूजा करण्याचे महत्त्व :
- वटवृक्ष हा शिवरूपी आहे. शिवरूपी वटवृक्षाची पूजा करणे, म्हणजे वटवृक्षाच्या माध्यमातून शिवरूपी पतीलाच एकप्रकारे स्मरून, त्याचे आयुष्य वाढून त्याची आयुष्यातील प्रत्येक कर्माला साथ मिळावी, यासाठी ईश्वराची पूजा करणे. कर्माला शिवाची जोड असेल, तर शक्ती व शिव यांच्या संयुक्त क्रियेने व्यवहारातील कर्म साधना बनून त्याचा जिवाला फायदा होतो.
वटवृक्षाला सूत गुंडाळण्याचे महत्त्व :
- वटवृक्षाच्या खोडाच्या उभ्या छेदावर असणार्या सुप्त लहरी शिवतत्त्व आकृष्ट करून वायुमंडलात प्रक्षेपित करतात. ज्या वेळी वटवृक्षाच्या खोडाला सुती धाग्याने गुंडाळले जाते, त्या वेळी जिवाच्या भावाप्रमाणे खोडातील शिवतत्त्वाशी संबंधित लहरी कार्यरत होऊन आकार धारण करतात. सुती धाग्यातील पृथ्वी व आप या तत्त्वांच्या संयोगामुळे या लहरी जिवाला ग्रहण करण्यास सुलभ होतात.
वडाच्या पूजनामध्ये पाच फळे का अर्पण करावीत ? :
- फळे ही मधुररसाची, म्हणजेच आपतत्त्वाची दर्शक असल्याने फळांच्या समुच्चयाकडे आकृष्ट व प्रक्षेपित होणार्या देवतांच्या लहरी कमी कालावधीत जिवाच्या देहातील कोषांपर्यंत झिरपू शकतात.
पूजा साहित्य:-
- 2 हिरव्या बांगड्या, शेंदुर, एक गळसरि, अत्तर, कापुर, पंचामृत, पुजेचे वस्त्र , विड्याचे पाने, सुपारी, पैसे, गुळ खोबरयाचा नैवेद्य, आंबे , दूर्वा, गहु , सती मातेचा फोटो किंवा सुपारी इ.
पूजन विधी:-
- वडाच्या झाडाला किंवा वतपौर्णिमाच्या कागदाला ( वटपौर्णिमेचा कागद बाजारात मिळतो) तिहेरी दोरा बांधावा. सूत कापसाचे काढलेले असावे.
प्रथम सुपारिच्या गणपतीची स्थापना करावी. त्याची हळद कुकुं अक्षता वाहुन पंचोपचार पूजा करावी. नंतर सती मातेच्या सुपारिचि पण पंचोपचार पूजन करावे. वडाचे मूळाजवळ अभिषेक पुरुष सुक्तासह षोदशोपचार किवा पंचोपचार पूजन व् आरती करावी. स्रियांनी या दिवशी उपवास करावा दुसऱ्या दिवशी सकाळी 10 नंतर सोडावा. वडास हल्दी कूकु वाहून आंबे पैसे वडापुढे ठेऊन नमस्कार करावा. वडाला तिन प्रदक्षिणा घालाव्यात. 5 सुवासिनींची आंबे व गव्हाने ओटी भरावी.
पतिव्रता स्री कशी असावी याचा सावित्री हा आदर्श मानला जातो. खालील मन्त्र म्हणून वडास नमस्कार करावा.
" सावित्री ब्रम्हा वादिनी सर्वदा प्रिय भाषिणी।
तेन सत्येनमां पाहि दुःखसंसार सागरात।।
अवियोगि यथा देव सवित्र्या सहीतस्य ते।
अवियोग तथास्माकं भूयात् जन्म जन्मनि।।"
या दिवशी सुवासिनी स्रियांनी प्रार्थना करावी व् वडाचे झाडास सूत गुंडाळून षोडसोपचरे पूजा करावी. सायंकाळी सुवासिनी सह सवित्रीच्या कथेचे सामुदायिक वाचन करावे.
प्रार्थना :
सर्व पवित्र वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो. अशा वटवृक्षाचे पूजन करून स्त्रिया `मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले-नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे', अशी प्रार्थना करतात....!!!
- वटसावित्री चे उखाणे - भाग १ ----साठी क्लीक करा
0 comments